महाराष्ट्र शासन “MCED” मार्फत १० दिवसीय ऑनलाईन, “उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम”
महाराष्ट्र शासन – उद्योग विभागाच्या, उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत, “MCED” मार्फत १० दिवसीय ऑनलाईन, “उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम” :
उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणारे व उद्योग उभारणीसाठी भांडवालाची आवश्यकता असणाऱ्या युवक – युवतीं करिता सुवर्ण संधी !!!
🔸 पात्रता:- व्यवसाय सुरू करू इच्छिणारे सुशिक्षित बेरोजगार युवक/ युवती/ गृहीणी/ बचत गटातील सदस्य.
🔸 अभ्यासक्रम:
◆ उद्योग – व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, कोठे करावा ? या बद्दल तज्ञ मार्गदर्शका मार्फत सविस्तर मार्गदर्शन.
◆ उद्योग संधी शोधन, अनेक उद्योग – व्यवसायांची माहिती, घर बसल्या करण्या योग्य अनेक व्यवसायांची माहिती, कमी भांडवलात, कमी जागेत व अधिक नफा देणारे अनेक उद्योगांची माहिती.
◆ उद्योग – व्यवसायांसाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री, कच्च्या मालाची संपूर्ण माहिती.
◆ बँकिंग, बँकेचे कर्जासाठी नियम व अटी, कर्ज मर्यादा, व्याज दर बद्दल बँक अधिकाऱ्या मार्फत माहिती व मार्गदर्शन.
◆ शासनाच्या आणि बँकेच्या विविध कर्ज योजना. उदा.: CMEGP, PMEGP, SEED MONEY, LOAN SCHEME, आत्मनिर्भर भारत योजना….
◆ बाजारपेठ पाहणी काशी करावी, प्रकल्प आहवल कसा तयार करावा या बाबत मार्गदर्शन.
◆ IPR : Patent, Copy Rights, Trademark Law बद्दल ची माहिती देण्यात येणार आहे.
◆ डिजिटल मार्केटिंग, रेजिस्ट्रेशन, GST, उद्योग आधार, पॅकेजिंग, या बद्दल माहिती व मार्गदर्शन
◆ CMEGP कर्ज योजने चा ऑनलाईन फॉर्म भरून देण्यात येईल.
यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना, महाराष्ट्र शासना च्या उद्योग खात्याअंतर्गत कार्यरत MCED चे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी अंतिम तारीख:- २१ फेब्रुवारी २०२१
कार्यक्रम कालावधी: दि.२२ फेब्रुवारी २०२१ ते ०३ मार्च २०२१
ऑनलाइन नोंदणी करिता खालील लिंकला भेट द्या:
https://mced.co.in/Training_Details/?id=380
कोड नंबर १२
अधिक माहितीसाठी संपर्क :
१) श्री. एस. के. बायस (जिल्हा प्रकल्प अधिकारी, MCED, ठाणे )
7774053014
२) शुभांगी धायगुडे – 8652687227