स्वर्गिय आण्णासाहेब पाटील स्मृती दिन विनम्र अभिवादन….!
माझे आजोबा..!
चिरकाल स्मृतींचा ठेवा…!
स्वातंत्र्य चळवळीत काम करत असताना, जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटताना जी लोकप्रियता प्राप्त झाली ती खरोखरच असामान्य व्यक्तित्वाची होती… आपण पं.नेहरुंपेक्षाही जास्त मताधिक्यानी निवडून येत देशाचं लक्ष वेधलं होतं. राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना आपले मन खेड्यापाड्यापर्यंत जात होते म्हणून गावखेड्यातील लेकरांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केलीत, बोर्डींगच्या सुविधा केल्यात. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत, कामगारांच्या आंदोलनासाठी देखील पुढे सरसावले, खान्देशातील 156 गावे गुजरातला जोडली जात असताना आंदोलनात सक्रियतेने सहभागी होते. असे शेतकरी, कष्टकरी यांचा आवाज म्हणून उभे राहिलेले माझे आजोबा म्हणून मला व आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आपला सार्थ अभिमान वाटतो.
आण्णासाहेब आपल्या अशा असंख्य आठवणी व कार्यकर्तृत्वाचा आदर्श आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे…..
आज 12 जून अर्थातच आण्णासाहेब आपला स्मृतीदिन, या स्मृती दिनानिमित्त आपल्या पवित्र चरणी विनम्र अभिवादन….!
श्री कुनाल रोहिदास पाटील